एक जसं Beauty parlor असतं- देखणा चेहरा करणार, तसं एक आत्म्याचंही Beauty parlor असतं ’वाचनालय’ नावाचं! सुंदर वाचन चिंतन मनन श्रवण आपल्याला अंर्तबाह्य सुंदर करतं.....
परीक्षेतलं यश, अपयश म्हणजे केवळ
आयुष्याचं अंतिम ध्येय नाही; जगण्याचं शिखर पुढे आहे
केवळ अन्नचं नाही,
आयुष्यही शिजत ठेवावं लागतं
कण न कण उकळत ठेवावा लागतो.
तेंव्हा कुठे जीवनाला चव येते.
चला तर करूया त्या चवदार आयुष्याचं स्वागत!
हात मिलाओ -
अगदी घट्ट -
प्रचंड निश्चयाचा!
नव्या गतीने, पुढच्या शिखराकडे निघण्याचा!
वाटेतला एखादा काटाही पचवण्याचा.
नव्या कळीला फुल होण्याचे निमंत्रण देण्याचा!

No comments:
Post a Comment